तळजाई | Taljai Tekdi | Taljai hills

 पाचगाव पर्वती उद्यान


वसुंधरा जैवविविध उद्यान म्हणजेच पाचगाव पर्वती उद्यान हा तळजाई टेकडीवरील १०७ एकरमधील महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि दररोज इथे मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहेत त्यामध्ये, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, योग आभास साठी छोटे छोटे पॅगोडे , संरक्षक भिंत तसेच पिण्याचे  पाणी व सुलभ स्वच्छालय सुविधा इथे कारणात येत आहे.

तळजाई पाचगाव पर्वती उद्यान हे पर्यटकांसाठी खास आकर्षण बनले आहे. खूप घनदाट झाडी, मोट मोठे वृक्ष तसेच अनेक वेगवेगळ्या वेली इथे पाहायला मिळतील. तळजाई टेकडी  चे नाव हे तळजाई माता देवी  वरून पडले आहे, या देवीची ची मूर्ती हि पाठीमागील तळयात सापडली आहे अशी आख्याईका आहे  त्यावरून इथले नाव तळजाई देवस्थान व तळजाई उद्यान टेकडी असे करण्यात आले. नवरात्रि मध्ये इथे मोठा उत्सव साजरा केला जातो, नऊ दिवस देवीची वेगवेगळी स्वरूपात पूजा बांधली जाते व नवव्या दिवशी होमहवन  केला जातो. आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या  संख्येने  मंदिरास भेट देतात. संपूर्ण तळजाई परिसरात ४-५ खुल्या जिम आहेत तसेच स्वामी रामदेव बाबा क्रीडासंकुल व जलतरण तलाव आहे. या सुविधा पुणे महानगरपालिका तर्फे पुरवण्यात आल्या आहेत.

 तळजाई हे राखीव स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करते आणि ससा , साप , कबुतर व मोरांचे घर आहे. त्यामुळे हे ठिकाण हौशी पक्षी व प्राणी निरीक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.  पक्षीशास्त्रज्ञ यांच्या अलीकडील अभ्यासातून असे निष्कर्ष काढले गेले की तळजाई येथील तलाव प्लास्टिक कचऱ्याच्या डंपिंगमुळे मरत आहे. उद्यान पहाटे 5 ते 10 आणि संध्याकाळी 4:30 ते 7:00 पर्यटकांसाठी खुले आहे. तसेच क्रिकेट प्रेमींसाठी इथे भव्य असे सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम आहे व मॉर्निंग walk करण्यासाठी जॉगिंग ट्रॅक ५०० मीटर लांबीचा सुद्धा उपलब्द आहे. खूप सुंदर आणि हिरवेगार गवताचे गालिचे इथे पाहायला भेटतील, बागेची रचना  हि खूप सुंदर व आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे. तसेच योग करण्या साठी वेगळे ध्यानकेंद्र तयार करण्यात आले आहे. फुलपाखरांच्या वाडी साठी खास वेगळे उद्यान करण्यात आले आहे. 

खाली नमुद केलेल्या नियोजित गोष्टी या इथे करण्यात येणार आहेत.

  • १.       कौशल्य विकास  केंद्र

  • २.       तळजाई माता मंदिर विकास
  • ३.       ई लर्निंग स्कूल
  • ४.      सेंट्रल थिम पार्क
  • ५.      रानमेवा उद्यान प्रकल्प
  • ६.      ऍथलिट पार्क
  • ७.      सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम
  • ८.      सोलर रूफ पार्किग
  • ९.      महिलांसाठी स्वतंत्र क्रीडांगण
  • १०.   सेंद्रिय शेती व प्रशिक्षण  केंद्र 
  • ११.    विविध उपक्रमाकरिता मोकळे मैदान.

.........आपण जर निसर्ग प्रेमी असाल तर इथे नक्की आवर्जून भेट द्या आणि इथल्या जैवविविधतेचा अनुभव घ्या.

 

"पावलाच्या ठश्याशिवाय येथे काही ठेवू नका .. 

सुखद  निसर्ग आठवनीशियाय  येथून काही नेऊ नका"